शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भोसेजवळ अपघातात दोन ठार, तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:49 IST

मिरज : मिरज-पंढरपूर रस्त्यावर भोसेजवळ कंटेनरने पिकअप् टेम्पोला ठोकरल्याने दोघेजण ठार झाले, तर तिघेजण जखमी झाले. जखमी व मृत बार्शी तालुक्यातील असून, कोल्हापूर येथे सीताफळ विक्री करुन ते परत जात असताना हा भीषण अपघात झाला. अपघातामुळे पंढरपूर रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. हा अपघात बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास झाला.पंढरपूर ...

मिरज : मिरज-पंढरपूर रस्त्यावर भोसेजवळ कंटेनरने पिकअप् टेम्पोला ठोकरल्याने दोघेजण ठार झाले, तर तिघेजण जखमी झाले. जखमी व मृत बार्शी तालुक्यातील असून, कोल्हापूर येथे सीताफळ विक्री करुन ते परत जात असताना हा भीषण अपघात झाला. अपघातामुळे पंढरपूर रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. हा अपघात बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास झाला.पंढरपूर रस्त्यावर भोसे हद्दीत पंढरपूरच्या दिशेने जाणाºया पिकअप् टेम्पोला (एमएच २५, पी ५८१७) समोरून मिरजेच्या दिशेने भरधाव येणाºया कंटेनरने (एचआर ५५, एपी २९०४) ठोकरले. कंटेनरच्या जोरदार धडकेमुळे टेम्पोच्या हौद्यात बसलेल्या पाचजणांपैकी दोघांचा मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले. नबी मौला शेख (वय ४७, रा. पांगरी, ता. बार्शी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी अवस्थेतील खंडू चंद्रकांत चांदणे (३०, रा पांगरी, ता. बार्शी) यांचा मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर मृत्यू झाला. तसेच दस्तगीर याकूब शेख (२५, रा. पांगरी) व राजू चांद शेख (४०, रा. पांगरी) या दोन जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत, मनोहर शिंदे (रा. बार्शी) हे किरकोळ जखमी झाले आहेत.कंटेनरच्या जोरदार धडकेमुळे पिक-अप् टेम्पो रस्त्याकडेला उलटून टेम्पोचा हौदा तुटून रस्त्याकडेच्या झाडीत अडकला होता. टेम्पोचालक मेहबूब शेख (रा.पांगरी), संभाजी ऊर्फ आप्पासाहेब तुळशीदास शिंदे (रा. चिंचोली) व समीर बशीर पठाण (रा. उस्मानाबाद) हे चालकासोबत पुढे बसलेले तिघेजण सुदैवाने बचावले.अपघातानंतर पंढरपूर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील, पोलिस निरीक्षक मोहन जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. क्रेनच्या साहाय्याने टेम्पो व कंटेनर हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. कंटेनर चालकाने अपघातानंतर पलायन केले. अपघाताबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात समीर पठाण याने फिर्याद दिली असून, फरारी कंटेनर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगलीच्या पोलिस अधीक्षकांचे भाऊ बचावलेअपघातातील मृत व जखमी बार्शी तालुक्यातील शेतकरी व फळे वाहतूक करणारे आहेत. पांगरी पांढरी व चिंचोली येथील हे सर्वजण मेहबूब शेख यांच्या टेम्पोतून कोल्हापुरात सीताफळे विक्रीसाठी आले होते. सकाळी शाहू मार्केट यार्डात सीताफळे विक्री करुन ते गावी परत जात होते. सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचे भाऊ संभाजी ऊर्फ आप्पासाहेब शिंदे हे सुध्दा त्यांच्या शेतातील सीताफळे विक्रीसाठी या टेम्पोतून आले होते. संभाजी शिंदे या अपघातात सुदैवाने बचावले.टेम्पोचा चक्काचूरअपघातात मृत नबी शेख यांच्यासोबत आलेला त्यांचा भाचा समीर पठाण हा वाचला. समोरुन भरधाव वेगाने येणाºया कंटेनरला चुकविण्यासाठी टेम्पो रस्त्याकडेला घेतल्यानंतरही, टेम्पोच्या हौद्याला कंटेनरने ठोकरल्याने टेम्पो उलटून टेम्पोचा चक्काचूर झाला.

टॅग्स :Accidentअपघात